ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् । नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥ 

श्री नृसिंह अलंकार पूजा 

श्री लक्ष्मी अलंकार पूजा 

श्री चा महानैवेद्य     

पेशवेकलीन वास्तूशिल्प   

प्रह्लाद मंडप 

श्रीमंत सरदार रघुनाथराव विंचुरकर  

दक्षिण प्रयाग 

उमा रमा एक सारी| वाराणसी ते पंढरी|| 

गया तेची गोपळपुर | प्रयाग नीरा नरसिहपूर||

                               -जगतगुरू संत तुकाराम महाराज 

ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्या चे ते शेवटचे टोक आहे. क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे.


प्रसादालय 

दररोज दुपारी १२.१५ ते २.०० 

नृसिंह भक्तासाठी दररोज दुपारी प्रसादाची मोफत सोय केलेली असते. अन्नदान करण्यासाठी भाविक भक्तानी सढळ हाताने यथाशक्ति देवस्थानला देणगी द्यावी!! ही नम्र विनंती .




अखंड नंदादीप

श्री च्या गाभर्यामद्धे अखंड शुद्ध तुपाचे (चांदीच्या दांडीवरील समयामध्ये) नंदादीप देवस्थान मार्फत लावलेले असतात. भाविक भक्तानी सढळ हाताने शुद्ध तूप अथवा देणगी देवस्थान कार्यालयामध्ये जमा करावी. ही विनंती.!!


भागवत सप्ताह 

मार्गशीष वद्य ९ , व मार्गशीष वद्य १०  देवालयाचा वर्धापन दिना निमित्त भागवत सप्ताहाचे
आयोजन करण्यात येते . 

भाविक भक्त उत्साहाने कथा श्रवण करण्यासाठी येतात.  ( दि. ३१.१२.२०२३ भागवत सप्ताह प्रारंभ )

गरुडोत्सव 

श्री क्षेत्र नीरा-नरसिंहपुर येथे श्री विष्णूचे वाहन गरुड

प्रतिवर्षी वैकुंठ चतुर्दशी दिवशी एक नविन हे उत्सव साजरा करण्याची प्रथा सरदार रघुनाथराव विंचुरकरांनी निर्माण केली. त्यासाठी दक्षिण भारतातील कंपली येथील सनगर कारागिरांकडून त्यांनी श्री विष्णूचे वाहन जो गरुड त्याची एक भव्य मूर्ती तयार करवून ती श्री नृसिंहास अर्पण केली. ही मुर्ती या देवस्थानाची व आकर्षक ठेव आहे. अत्यंत बांधेसूद व डौलदार अशी हीमूर्ती स्वतः बरोबर कलाकारांच्या कलेलाही वंदन करावयास लावते .

मंगलम् भगवान विष्णु ।मंगलम् गरुडध्वज। 

मंगलम् पुंडरीकाक्ष। मंगला यतनम् हरी: । 


या मूर्तीच्या मस्तकी

श्रीच्या पादुका ठेऊन गरुडाची मिरवणुक

गावातून वैकुंठ चतुर्दशीस निघते.

या उत्सवाचा प्रारंभ शके १८०३ पासून झाला.


गरुड गायत्री:- “।ॐ पक्षी राजाय विद्महे

सुवर्ण पक्षाय धीमही तन्नो गरुड: प्रचोदयात.।“


श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर येथे गरुडाची पाच स्थाने आहेत.

ती अशी-

१.प्रल्हाद मंदिरातील गरुड.

२.दशावतारातील गरुड.

३.विंचूरकर अर्पित गरुड.

४.दक्षिण ओवऱ्यांतील गरुड.

५.शामराजाच्या पाठभिंतीतील गरुड.

श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट सन 1950 पासून अस्तित्वात असून मंदिर व्यवस्थापन व श्रींचे उत्सव व इतर वर्षभरातील उत्सवांचे आयोजन करते.

देवस्थान ट्रस्ट तर्फे खालील उपक्रम राबवले जातात.

1. दररोज अन्नदान ( वर्षभर) 

2. मंदिर व परिसरातील सर्व इमारती व उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती

3. श्रींचा व श्री महालक्ष्मी देवीला रोजचा नैवेद्य आणि सर्व पूजा खर्च

4. श्रींचा वैशाखी उत्सव सर्व नामवंत कलाकारांतर्फे साजरा केला जातो.

Link
YouTube
Link
Facebook

©2023 सर्व हक्क श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट , नीरानृसिंहपूर (Nira Narsinhpur) देवस्थान विश्वस्थ मंडळ यांचे कडे राखिव.

साहित्याचार्य वै.गो.ह.दंडवते यांचे पुस्तकाचे संदर्भांवरून व श्री.सूर्यनारायण गो. दंडवते यांचे सौजन्याने या संकेतस्थळावरीळ बहुतांश माहिती संकलित केलीली आहे.